कासार्डे माध्यमिक विद्यालय ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमाने साजरा

कणकवली ता.२८-:* 28 फेब्रुवारी 1958 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांनी “प्रकाशाचे विकरण ” हा महत्त्वाचा शोध लावला, या शोधासाठी 1930 मध्ये त्यांना “नोबेल पारितोषिक” मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भोसले संजय भोसले व शामसुंदर राणे यांच्या शुभहस्ते डॉ. सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी विज्ञानविभाग प्रमुख शिक्षिका सौ. सविता पाटील, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांमधून कु.समृध्दी माने,कु.रिना सावंत,कु.अनुष्का पोकळे,कु. सायली लिंगायत,व कु.निरज पाळेकर आदी विद्यार्थ्यांनी डॉ. सी.व्ही. रमण यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर कल्याणकर,अनंत काणेकर, दत्तात्रय मारकड,सौ.दिपाली मिठबांवकर,सौ.आरती पेडणेकर, ऋषिकेश खटावकर,श्री.नवनाथ कानकेकर आदीसह शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page