मनसेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा…

तालुक्यातील कोव्हिड योध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सन्मान…

सावंतवाडी ता.२८-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने काल मराठी भाषा दिन हा जल्लोषात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील कोविड योद्धा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथम आलेली कुमारी अन्वी मुकुंद धारगळकर आणि उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कृत श्री विश्वनाथ नाईक यांचा मनसेच्या वतीने श्री उपरकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

व सर्वांना श्री उपरकर यांनी शुभेच्छा दिल्या व कोणतीही अडचण असल्यास आपल्याशी व येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क करावा आम्ही नेहमी खंबीर तुमच्या पाठीशी आहोत असे श्री उपरकर यांनी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाचे आयोजन आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब व त्यांच्या आयोजित केला होता यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, शहराध्यक्ष अशिष सुभेदार माजी तालुका संपर्क अध्यक्ष महेश परब कुडाळ सचिव राजेश टंगसाळी धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक तिरोडा शाखाअध्यक्ष संदेश शेट्ये पिंगुळी शाखा अध्यक्ष वैभव धुरी करणे विभाग अध्यक्ष अभय देसाई मुकुंद धारगळकर संतोष सावंत आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

You cannot copy content of this page