आ केसरकर यांच्या वक्तव्यावर अमित परब यांचे उत्तर;कोरोना काळात कुठे होता ? असाही केला प्रश्न
सावंतवाडी ता.२७-: कोरोना महामारी च्या काळात ज्या वेळी जनतेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती त्यावेळी दीपक केसरकर कुठे लपून बसले होते असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाला प्रतिउत्तर देते वेळी केला आहे तर भविष्यात येणारा नगरपालिका निवडणुकीत तुम्ही तळ ठोका नाहीतर काहीही करा नगराध्यक्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा बसणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी आपण शहरात तळ ठोकून बसणार असल्याचे विधान आमदार दीपक केसरकर यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केले होते. या विधानाला चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे तर ते पुढे म्हणाले की कोरोना महामारी च्या काळात भाजप नगराध्यक्ष व सहकाऱ्यांनी जनतेच्या सहवासात राहून कमळ थाली, धान्य वाटप, तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. हे शहरातील जनतेला ज्ञात आहे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर,आदी उपस्थित होते
