आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक…
सावंतवाडी ता.२६-:* आमदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सावंतवाडी मतदार संघातील सर्व योजनांच्या कामांचा आढावा घेऊन त्यात उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्यावर योग्य तो मार्ग काढण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत पनवेलकर, तहसीलदार, उप वनरक्षक सावंतवाडी, बांधकाम विभागाचे अभियंता, उप अभियंता, पोलिस निरीक्षक इत्यादी शासकीय सर्व अधिकारी उपस्थित होते.
