ओझर विद्यामंदिरमध्ये २८ रोजी मार्गदर्शन शिबीर

मालवण : (प्रतिनिधी) अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला समिती मालवण व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा-मालवण आयोजित सुमेधा कांबळी चॅरिटी ट्रस्ट प्रायोजित ‘मराठी भाषा कौशल्य विकास’ अंतर्गत माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात महाराष्ट्र मराठी अध्यापक त्रैमासिकचे संपादक भरत गावडे, साहित्यिक विठ्ठल कदम, संयोजक सदानंद कांबळी, सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकुर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page