*💫वैभववाडी दि.०६-:* भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत उर्फ राजू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. राजू पवार तालुक्यातील एडगांव गावचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीच्या काळात भाजपा पक्ष संघटना वाढीत महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. यापूर्वी वैभववाडी तालुक्यात युवा मोर्चा अध्यक्ष पदी त्यांनी चांगले काम केले आहे. मध्यंतरी त्यांनी सेनेत प्रवेश केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री पवार हे परत स्वगृही परतले आहेत. तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या उपस्थितीत ते भाजपवाशी झाले आहेत. संघटनेत अनुभवी असलेल्या पवार यांना पुन्हा जिल्ह्याच्या पदावर पक्षाने संधी दिली आहे. यावेळी राजू पवार म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. एडगांव ग्रामपंचायत निवडणुकीसह तालुक्यातील इतर ठिकाणी प्रचारात सहभागी होत या निवडणुकीत भाजपा शत- प्रतिशत करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी राजू पवार यांची निवड.
