भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे : तहसीलदारांना दिले निवेदन
*⚡सावंतवाडी ता.२४-:* महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिम यांच्यासोबत झालेल्या मालमत्ता व्यवहाराचा ठपका ठेवून इडी ने काल सकाळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ३ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या अशा भ्रष्ट असलेल्या आणि गुन्हेगारांशी सबंध असलेल्या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास भाजप आगामी काळात तीव्र स्वरूपात निदर्शन करेल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी बांदा शहर मंडळ महेश धुरी, शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर, युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, विनोद सावंत, अजय सावंत,अमित परब,अमित गवंडळकर,हेमंत बांदेकर,आदी उपस्थित होते.
