आमदार दीपक केसरकर यांचे गौरवोद्गार…
वैभववाडी प्रतिनिधी नापणे सारख्या छोट्या गावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला महोत्सव म्हणजे इतर गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे . असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री तथा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नापणे महोत्सवांच्या सांगता कार्यक्रमात केले.
१७ , १८ व १ ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नापणे गाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गावातील अबाल वृध्द , महिला पुरुषांसाठी विविध स्पर्धा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपिठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे . सन १९६० पासून दुग्धक्रांती, हरित क्रांती संपन्न असलेल्या अखिल नापणे गावामध्ये सहकार व सहकार्याचे प्रथम वर्ष निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तिींच्या जयंती निमित्ताने १७ , १८ व १ ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नापणे गाव महोत्सवाचे गावातील अबाल वृध्द , महिला पुरुषांसाठी विविध स्पर्धा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपिठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .
रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,धावणे स्पर्धा , रस्सी खेच ,स्पर्धा चमचा गोटी स्पर्धा ,महिलांसाठी,हळदी कुंकु ,फुगडी स्पर्धा, संगीत खूर्ची स्पर्धा,होम मिनिस्टर स्पर्धा, तसेच विविध वैयक्तिक कलागुण सादरीकरण , गरबानृत्य वकृत्व स्पर्धा , जेष्ठांसाठी श्री . व सौ . स्पर्धा दूरध्वनी क्रमांक मार्गदर्शिका प्रकाशन,अशा विविध कलागुणांन सादरीकरण करण्यात आले नापणे गावातील लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला प्रथम आयोजित कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला .
नापणे गावच्या महोत्सवाला माजी पालकमंञी दिपक केसरकर,शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे,सुशांत नाईक, दिगंबर पाटील, तालुकाप्रमुख मंगेश लोके,प्रभाकर लोके,जि.प.सदस्य सुधीर नकाशे,प.सं सभापती सौ.अक्षता डाफळे,जयेंद्र रावराणे ,नगरसेवीका सौ.अक्षता जैतापकर यांनी महोत्सवाला भेट देऊन नापणे ग्रामस्थांचे कौतुक केले
नापणे गावातील ग्रामस्थांनी १७ ते १९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नापणे महोत्सव आयोजित करण्यात आला होता गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धां पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नापणे गावातील ग्रामस्थांनी १७ ते १९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नापणे महोत्सव आयोजित करण्यात आला होता गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धां पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
