जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक…
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, कोकिसरे, लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील युवासेना पदाधिकारयांची आढावा बैठक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रत्येक गावात युवासेनेचे शाखाप्रमुख नियुक्ती करणे, प्रत्येक विभागात युवासेनेचे फलक लावणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी पोलीस अधिकारी श्री. संदीप सरवणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सुशांत नाईक व श्री. संदीप सरवणकर यांचा विभागाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्त पदाधिकारयांच्या नियुक्त्या जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जाहीर केल्या.
यामध्ये कोळपे जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी आकाश सीताराम गुरव, कोकिसरे पंचायत समिती उपविभागप्रमुख पदी राजेश सखाराम पवार, दिगशी शाखाप्रमुख पदी सागर सतीश पवार, हेत शाखाप्रमुख पदी सुशील परशुराम कदम, मौदे शाखाप्रमुख पदी योगेश दत्ताराम कदम, सांगुळवाडी शाखाप्रमुख पदी गणेश जयराम राऊत, खांबाळे पंचायत समिती उपविभागप्रमुख पदी निखिल चंद्रकांत मोरे, लोरे नं-२ च्या शाखाप्रमुख पदी, उपशाखाप्रमुख पदी अमोल प्रकाश गोरुले यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, तालुकाप्रमुख अतुल सरवटे, तेजस राणे, लोरे सरपंच विलास नावळे, जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, सिद्धू गावडे, रोहित रावराणे, सिद्धेश रावराणे, विशाल राणे, वसंत मोरे, प्रथमेश तळेकर, गणेश धुरी, ओमकार इस्वलकर यशवंत गवाणकर, चंद्रकांत आमरसकर, श्रीकांत डाफळे, समाधान काडगे, शंकर कोकरे, अनिल नराम, रुपेश पाचकूडे, दिलीप मांजलकर, जयेश पवार, सत्यवान सुतार, युवराज रावराणे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
