नवीन निवृत्तीवेतन योजना रद्द करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

सरकारी निमसरकारी आणि शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप…

सावंतवाडी ता.२३-:* नवीन निवृत्तीवेतन योजना रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर अनेक मुद्द्यांवरून सरकारी निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपाला आज येथील तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या राज्यव्यापी संपामुळे लोकांच्या गर्दीने भरलेली शासकीय कार्यालये आज लोकांविना सुनीसुनी झाली होती.

नविन पेन्शन योजना (NPS) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय NPS कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तत्काळ राज्यात लागू करा. किमान पेन्शन मध्ये केंद्रासमान उचीत वाढ़ करा. सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंत्राटी व योजना कामगार (आंगणवाडी, आशा वर्कर्स, महिला परिचर इ.) यांच्या सेवा नियमित करा. शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण/ कंत्राटीकरणास सक्तविरोध. बक्षी समिती अहवालाचा खंड-२ प्रसिध्द करा. सर्व रिक्त पदे तत्काळ भरा सर्व भत्ते केंद्रासमान द्या.

अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा तसेच कोरोना काळात वयाधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या. नर्सेस/ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तत्काळ सोडवा. निवृत्तीचे वय ६० वर्षे करा. नवीन शिक्षण धोरण रद्द करा. किंमती कमी करण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांवरील केंद्रीय कर कमी करा. आणि इतर १४ महत्वाच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता सरकारी निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला आज येथील तालुक्यात चांगला प्रतिसाद दिसून आला अनेक सरकारी निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रजा अर्ज दाखल करत संपत सहभागी झाले होते यामुळे कार्यालयात कर्मचारीच नसल्याने कामानिमित्त आलेल्या अनेक लोकांना माघारी परतावे लागले. प्रांत कार्यलाय, तहसील कार्यालय, पंचायत समिती अशी रोज गजबजलेली कार्यालये आज सुनी सुनी झाली होती या संपाचा कार्यालयीन कामावर देखील मोठा परिणाम झाला कार्यलयांच्या प्रवेश द्वारावरच संपात सहभागी व्हावे असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते

You cannot copy content of this page