मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

वेंगुर्ला ता.२३-:* वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेमध्ये रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या ग्रंथप्रदर्शनात संदर्भ, लेख, चरित्र, भाषाशास्त्र, कथा-कादंबरी, कविता आदी विषयावरील दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page