चित्राक्षा मुळये, निर्जला कदम यांचा क्रीडामंत्र्यांनी केला सत्कार

ओरोस ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेमध्ये कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडू कु. चित्राक्षा मूळये (ब्लॅक बेल्ट) व कु. निर्जला कदम (ब्राउन बेल्ट) यांचा महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       

सदर खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये पदक पटकावले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्क्वॅश खेळ वृद्धिंगत होण्यासाठी योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई असोसिएशन सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष व कराटे प्रशिक्षक अ‍ॅड. विवेक राणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कराटे-स्वसंरक्षण विषयाच्या विविध योजना आणून त्या राबविणे महत्वाचे आहे  तसेच महिला सक्षमीकरणासाठी मार्शल आर्ट्स व स्वसंरक्षण यांचे फार महत्व आहे असे ब्रिगे. सुधीर सावंत सत्कार प्रसंगी सांगितले.        

स्क्वॅश हा शालेय खेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही स्क्वॅश कोर्ट नाही. स्क्वॅश कोर्ट होण्यासाठी  सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक राणे यांनी  क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरच स्क्वॅश कोर्ट उभारले जाईल याचे आश्वासन मंत्री सुनिल केदार दिले. यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस, सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग,  सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई असोसिएशन सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांकडूम कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page