भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती.
*💫सावंतवाडी दि.०६-:* कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी माजी महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनासाठी ते कणकवलीत येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहरध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, अमित पोकळे आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राष्ट्रीय काँग्रेस नाहक विरोध करत आहे. या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी ते उद्या कणकवली येणार आहे. यावेळी मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही तेली यांनी यावेळी आहे
