उदयोन्मुख कलाकार सौरभ माळवदे याचा सत्कार

वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला शहरातील उदयोन्मुख युवा कलाकार सौरभ माळवदे याने टीव्हीवर गाजत असलेल्या ‘गाव गाता गजाली‘, ‘बाळू मामा‘, ‘स्वराज्य जननी जिजामाता‘, ‘जिगरबाज‘, ‘रंग माझा वेगळा‘, ‘सावधान इंडिया‘ व ‘जय जय स्वामी समर्थ‘ या मालिकांमध्ये उत्कृष्टपणे छोट्या छोट्या भूमिका साकारुन आपल्यासह वेंगुर्ल्याचे नाव रोशन केल्याबद्दल त्याचा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळ आयोजित शिवजयंती कार्यक्रमावेळी हा सत्कार करण्यात आला. यावेळी लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर, प्राची मणचेकर, स्मिता कोयंडे, प्रतिक्षा मालवणकर, रुपाली पाटील, विवेक कुबल, शिवप्रेमी मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर, रोहीत वेंगुर्लेकर, प्रथमेश यंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे याने अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुंबई येथे वास्तव्य करताना रेल्वे स्टेशनवर वेंगुर्ल्याचे प्रसिद्ध खाजे विकून ऑडीशन दिली होती. त्याच्या या कार्याची दखल घेऊन शिवप्रेमी मंडळातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page