मालवण ता.२०-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंदर भूमितील भगवंतगड या किल्ल्यावर चिंदर सेवा संघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चिंदर गावातील प्राथमिक शाळेतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा व पोवाडे गायनाने परीसर दणाणून गेला होता. किल्ल्यावरील आराध्य दैवत श्रीदेव सिध्देशस्वराचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर, आय. पी. एस्.अधिकारी सुभ्रमण्य केळकर, सदाबुवा गोसावी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चिंदर गावातील सर्व प्राथमिक शाळांनमधून २२ मुलांनी सहभाग घेतला.सोहम् महेंद्र चिंदरकर यांनी गायलेले शिवस्फूर्ती गीत व दुर्गा म्हापसेकर तसेच गौरव दत्तदास यांनी गायलेल्या पोवाड्याने किल्ल्यावरील वातावरण शिवकालीन बनवले. वक्तृत्व स्पर्धेत १ते४ लहान गटात श्रावणी स्वप्नील सुर्वे (सडेवाडी शाळा) हिने प्रथम क्रमांक, विभावरी परेश चव्हाण (भटवाडी शाळा) व्दितिय क्रमांक तर मनस्वी नारायण चिंदरकर(कुंभारवाडी शाळा) हिने तृतीय क्रमांक मिळवीला. तर मोठ्या गटात डँरेल दिनेश फर्नांडिस(कुंभारवाडी शाळा) याने प्रथम, दुर्गा श्रीप्रसाद म्हापसेकर(पालकरवाडी शाळा) व्दितिय क्रमांक तर कोमल संतोष(वायरमन)अपराज(अपराजवाडी शाळा)हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना खजिनदार गणेश गोगटे, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, आय. पी. एस् सुभ्रमण्य केळकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, उपाध्यक्ष विवेक परब, संदिप परब, अन्ना मसुरकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी किल्ल्यावर दिंगबर जाधव, महेंद्र कदम, पंढरिनाथ कामतेकर, मिलिंद चिंदरकर व बहुसंख्य शिक्षक, शिवप्रेमी, चिंदर वासीय उपस्थित होते. यावेळी बोलतान आय. पी. एस. सुभ्रमन्य केळकर यांनी मुलांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली व शिवाजी महाराजांन सारखे वागण्याचा प्रयत्न करा असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व समारोप सिध्देश गोलतकर यांनी केले. सुत्रसंचालन यशवंत पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण दत्तदास, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, अध्यक्ष संदिप पारकर, कौस्तुभ गोगटे, यशवंत पाटील निशिगंधा वझे सदाबुवा,गोसावी, मारुती हडकर, आशिष कोरगांवकर, प्रसाद टोपले यांनी मेहनत घेतली.
