वेंगुर्ला येथे नवीन दोन शिवसेना शाखांचे उद्घाटन

विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

*💫वेंगुर्ले दि.०५-:* वेंगुर्ला येथे आज शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते दोन नवीन शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या दोन्ही शाखा सेन्टलुक्स हॉस्पिटल नाका येथे एक तर दुसरी शाखा राऊळ वाडा येथे आहे. यावेळी यशवंत परब, बाळा दळवी, सचिन वालावलकर, संदेश निकम, सुनील दुबळे, अजित राऊळ, अस्मिता राऊळ, सुकन्या नरसुळे, मंजुषा आरोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page