इस्टोर कंपनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणार -परशुराम उपरकर…

या कंपनीची सेमीकडे तक्रार करणार; या कंपनीने केली 40 कोटीची आहे उलाढाल

*💫कणकवली दि.०५-:* इस्टोर कंपनी जिल्हातील मोठी गुंतवणूक झाल्यानंतर पळण्याची शक्यता आहे.नागरीकांनी गुंतवणूक करताना विचार करावा.४० कोटी या कंपनीने उलाढाल केली आहे.गोल्ड कोईन कंपनीने ३५ कोटीचा चुना गुंतवणूकदाराना लावला आहे.कुठल्याही वित्तीय संस्था व बँक तीन वर्षात तिप्पट करणाऱ्या नाहीत.त्यामुळेच जिल्ह्यातील तरुण युवकांना रोजगाराचे साधन दाखवून साखळी पध्दतीने मेंबर केले जातात.त्यात शिक्षक, अधिकारी या कंपन्यामध्ये काम करतात.या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना पत्र दिले.तसेच केंद्रीय वित्त मंत्रालय व सेमी विभागाला माहिती देणार आहे, अशी माहिती माजी आमदार, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये चैन सिस्टीमच्या अनेक कंपन्या येऊन तरुण मुलांना घेत काम करत आहेत.लाखो रुपये मिळणार सांगतात आणि फसवणूक करत आहेत.काही ठिकाणी शैक्षणिक साहित्य औषध उपचार करणारी प्रॉडक्ट पावणे साहित्य देण्याच्या नावाखाली साखळी पद्धतीने गुंतवणूक दारांना जवळ केले जात आहे. आदित्य फायनान्स, गोवा फायनान्स ,ग्रीन प्लस,सीटर्स ,ट्विंकल, पॅनकार्ड विविध कंपन्यांनी जनतेचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत.तरीही जिल्ह्यातील लोक आहारी जात आहेत. गुंतवणूक करतात,काही लोक जनतेचे पैसे लुबाडणूक करत आहेत.इस्टोर इंडिया या कंपनीत किराणा माल व साहित्य ३३ टक्के कमी दराने देण्याची योजना सुरु केली आहे. ही इस्टोर कंपनी ज्यांनी या जिल्ह्यात आणली,अनिल जाधव काम करत आहेत.हे नॅशनल चीफ आहेत,गोवा व महाराष्ट्र या राज्याचे शैलेश पेडणेकर काम आहेत.हा व्यवसाय करत आहेत,त्यात जनतेची फसवणूक होत आहे.कोणत्याही प्रकारची रिसीट कंपनीच्या नावाची नाही.टीडीएस सर्टिफिकेट दिली जात नाही असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे. या कंपनीत ३ हजार किराणा मालावर १ हजार सूट अशी योजना आहे.देवगड ४० टक्के व कणकवलीत ३० टक्के सूट बोर्ड लावला.वेदिका नावाचे प्रॉडक्ट्स आयुष्य मंत्रालयाची परवानगी नाही. आम्ही विचारले असता,महाराष्ट्र राज्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे पत्र आहे.टेंडमार्क ही १७ नोव्हेंबर २०२० ला मिळाला आहे.२००५ ला कंपनी हैदराबाद सुरु झाली आहे.कंपनी ऑडिट न केल्याने त्यांना २० लाखाचा दंड केला आहे.मुकेश कुमार त्यागी आहेत. मार्केटिंग एकही गुंतवणूकदार खरेदी करत नाहीत.विकत एकही दुकान नाही.इस्टोर ९,१५,२५ लाख गुंतवणूक घेऊन गुंतवणूकदारांना महिना १ लाख व विक्री वर ५ टक्के दिले जातात. एक कंपनी गुंतवणूकदारांना प्रॉडक्ट वर ५३ टक्के सूट देत असल्यामुळे काही दिवसातच कंपनी लोकांची फसवणूक ठरेल अशी भीती परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page