शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेकडून शिवजयंती साजरी…

देवगड ता.१९-: देवगड तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,सभापती नितीन बांदेकर, संतोष तारी तालुका प्रमुख विलास साळसकर सभापती यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी नगरसेवक बुवा तारी, रोहन खेडेकर,विशाल मांजरेकर,माजी नगरसेवक विकास कोयंडे,मच्छिमार संस्था संचालक धनंजय जोशी, युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,सौरभ माने,अमोल लोके,गणेश कांबळी उपस्थित होते.तालुक्यातील जामसंडे,पडेल व अन्य भागातील शिवजयंती उत्सवास देवगड जा मसंडे नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक,शिवसेना पदाधिकारी यांनी भेट देऊन अभिवादन केले. फोटो देवगड शिवसेना कार्यालयात शिवजयंती उत्सवात अभिवादन करताना नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष नगरसेवक व अन्य

You cannot copy content of this page