शिवजयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव…

अंगणवाडी सेविकांचा करण्यात आला सत्कार…

देवगड ता.१९-:पंचायत समिती देवगड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित आयोजित तालुका स्तरीय विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी ,व अंगणवाडी सेविका चा सत्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सभापती रवी पाळेकर, परिक्षावधीन कालावधी जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी संजिता महापात्र तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण),जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का महोत्सव सोहळा निमित्त संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम देवगड पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात आल्या.त्यांचा सन्मान सोहळा शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.

या वेळी माजी सभापती सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड,गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे,कुणाल मांजरेकर व अन्य उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने देवगड पंचायत समिती मार्फत मोटर सायकल रॅली गटविकास अधिकारी संजिता महापात्र ,सभापती रवी पाळेकर यांच्या उपस्थितीत देवगड शहरातून काढण्यात आली.त्यानंतर शिवप्रतिमा पूजन मान्यवर हस्ते करण्यात आले.या नंतर विजेत्यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला. यात वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा,पाककला स्पर्धा यांचा समावेश होता तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडला. पाककला स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक -शरयू शरद हिर्लेकर कुणकेश्वर (नाचणी शेवया रस) द्वितीय क्रमांक – अपर्णा अनिल जोशी वाडा मूळबांध( नाचणी अप्पे व ताक ) तृतीय क्रमांक -श्रीमती अनिता अनिल देसाई आयसीडीएस देवगड (गुळपोळी) उत्तेजनार्थ -प्रतिभा जयप्रकाश झोरे शिरगाव (मटण वडे) पूजा दीपक सावंत आयसीडीएस देवगड (मँगो शिरा),अंजली धोंडू पवार ओंबळ,(पुरण पोळी)याना देण्यात आला. पाककला स्पर्धेचे परीक्षण गटविकास अधिकारी संजिता महापात्र ,तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड यानी केले.

You cannot copy content of this page