वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संघाचे सेक्रेटरी रविंद्र पवार यांनी प्रास्तावना केली.तर ऋचा पवार यांनी महाराजांच्या जीवनावर गीत सादर केले.
संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरिञावर मार्गदर्शन केले.यावेळी कार्याध्यक्ष सुभाष कांबळे,उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, संतोष कदम, धोंडीराम तांबे,अमर कदम, प्रशांत कदम, अमर कदम, रुपेश कांबळे, मारुती कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचलन शरद कांबळे यांनी केले.तर आभार मंगेश कांबळे यांनी मानले. फोटो- छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना अध्यक्ष भास्कर जाधव व इतर पदाधिकारी . छाया संजय शेळके वैभववाडी
