तालुका कार्यालयात शिवसेनेकडून शिवजयंती साजरी…

वैभववाडी प्रतिनिधी शिवसेनेचेच्यावतीने तालुका कार्यालय वैभववाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिव प्रतिमेचे पूजन करून शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी.. जय शिवाजी च्या जयघोषात शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर, उपतालुकाप्रमुख दीलीप नारकर, नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक मनोज सावंत, शिवाजी राणे, संतोष रावराणे,शशिकांत रावराणे, उपशहर प्रमुख वामन करकोटे, राजाराम गडकर, स्वप्नील रावराणे, यशवंत गवाणकर, आप्पा सुतार, नितीन शेलार आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. फोटो- शिवसेनेचेच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त अभिवादन करतांना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते. छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page