अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलां व युवतींचा मराठा समाज उत्कर्ष मंडळाकडून सत्कार…

सावंतवाडी : मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी-दोडामार्गच्या माध्यमातून शिवजयंतीच औचित्य साधून भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर महिलांसाठी जिजाऊ महिला गौरव सन्मान सोहळा व हळदी कुंकू समारंभाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, मराठा समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष संजू परब, मराठा समाज उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्ष संजना परब आदी उपस्थित होते. यावेळी बहुजन समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला व युवतींचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये भारत पाटणकर गॅसच्या ऋचा पाटणकर, नीट परिक्षेत ५९० गुण मिळवून शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये निवड झालेली दोडामार्ग येथील पुर्वजा भणगे, दुग्ध व्यवसायातील युवा उद्योजिका सोनल देसाई, शिक्षण क्षेत्रात प्रा. मैथिली नाईक, अँड. निता सावंत कविटकर, आरोग्य सेविका सुचिता राऊळ यांचा शाल व श्रीफळ देऊन युवराज्ञींच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, मंडळाचे अध्यक्ष संजू परब, महिला मंडळ अध्यक्ष संजना परब, विनोद सावंत, संतोष सावंत, दत्ताराम सडेकर, भुपेंद्र सावंत, विनोद राऊळ, मकरंद तोरसकर, पंढरी राऊळ, विश्वनाथ राऊळ, मनोज नाईक, उज्वला सावंत, भक्ती सावंत, सुहासिनी सडेकर, मेघना राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page