सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून मनसेकडे द्याव्यात:परशुराम उपरकर
कणकवली १९ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शिवशाहीचे सरकार म्हणणारे विद्यमान आणि याआधीच्या सरकारने जनतेच्या प्रश्नाला तिलांजली देत एकमेकांच्या प्रॉपर्टीचे उणेधूने काढण्यात मग्न आहेत. जनतेला वीट आला आहे. जनतेने निवडून दिलेले चारही पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वतःची तुंबडी भरुन कौटुंबिक संपत्ती वाढविण्यात व्यस्त आहेत, हे जनतेला समजून आले आहे.लगावला.त्यामुळे राज्याच्या सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून मनसेकडे द्याव्यात, असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री, तालुकाप्रमुख दत्ताराम बिडवाडकर, शरद सावंत, प्रकाश चव्हाण, गिरीश उपरकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले राज्य सरकार शिवजयंती दिवशी ड्राय डे न ठेवता दारुची दुकाने उघडी ठेवली आहे. स्वतः राज्य सरकार दारुच्या आहारी गेल्याचे दाखवून देत आहे,अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. शिवशाहीचे सरकार म्हणणारे विद्यमान आणि याआधीच्या सरकारने जनतेच्या प्रश्नाला तिलांजली देत एकमेकांच्या प्रॉपर्टीचे उणेधूने काढण्यात मग्न आहेत. जनतेला वीट आला आहे. जनतेने निवडून दिलेले चारही पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वतःची तुंबडी भरुन कौटुंबिक संपत्ती वाढविण्यात व्यस्त आहेत, हे जनतेला समजून आले आहे. मागील राज्यसरकारात वाटेकरी असलेले सेना-भाजपावाले एकमेकांच्या कोट्यवधींच्या संपत्ती उघड करत आहेत. जे राज्यात तेच सिंधुदुर्गात सुरू आहे. भाजपा आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे काम सुरु केले आहे. विकासासाठी कोट्यवधी निधी आणल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात विकासापासून जनतेला दूर ठेवले जात आहे. एकमेकांवर शिंतोडे उडवून नंतर सत्तेसाठी एकमेकांची गळाभेट घेतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्याचीच प्रचिती आज राज्यात येत असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.त्यामुळे राज्याच्या सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून मनसेकडे द्याव्यात, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.
