मनसेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी…

सावंतवाडी -:शहर मनसेच्या वतीने आज सावंतवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शिवजयंती निमित्त मनसेच्या वतीने शिव आरोग्य सप्ताह ओटवणे या गावातून सुरू करण्यात आले आहे.

तसेच हा शिव आरोग्य सप्ताह येत्या पूर्ण आठवड्यात सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी राबविला जाणार आहे तरी सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे सावंतवाडी मनसेच्या वतीने आवाहन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत युवती तालुकाध्यक्ष ललिता नाईक कळणे विभागअध्यक्ष अभय देसाई विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष गोविंद मोरये मंदार सुभेदार सुरज देसाई आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page