सावंतवाडी ता.१९-:* सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांचा रामेश्वर प्लाझा येथील संपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजप कडून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, संजू विर्नोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
