वास्तूंच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम जगासमोर आणू-डॉ.लिगवत

वेंगुर्ला प्रतिनिधी-शिवकालीन वास्तू संवर्धन व संरक्षण यांच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम जगासमोर आणून भविष्यातील पिढी समृद्ध करताना पर्यटन वृद्धी पण केली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले टिकविले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवजयंती निमित्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिंगवत यांनी केले.

जनसेवा प्रतिष्ठान, माऊंटरनींग असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि जिल्हा युथ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील किल्ले डच वखारची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत डॉ. संजीव लिंगवत, सचिव व शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सई लिंगवत, डॉ.नयनेश गावडे, माऊंटरनींग असोसिएशनचे प्रकाश नारकर, जिल्हा युथ संघटनेचे डॉ.श्रीनिवास गावडे, श्रीकृष्ण जानकर, अंकुश कोंडीलकर, ओंकार नार्वेकर, ओंकार लाड, अनिकेत कुंनगीर पाटील, उमेश सोनवडकर आदी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page