सिंधुदुर्ग प्रवेशद्वारावर सिंधुदुर्ग किल्ला आणि महाराजांची प्रतिमा उभारण्याचा मानस…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी ता.१८-: बांदा येथे बांधण्यात येणाऱ्या सिंधुदुर्ग प्रवेशद्वारावर आता सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याची पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अशी प्रतिकृती बांधण्याचा मनोदय असून, त्याबाबत आपली चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हुकेरी या गावात 60 कोटी रुपये खर्च करून जलसंधारण प्रकल्प होणार असून याबाबत जलसंधारण मंत्री शंकर राव गडाक यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रकल्पाचा फायदा फुकेरी गावासह पंचक्रोशीच्या विकासासाठी होणार आहे. या जलाशयात बोटिंगची व्यवस्था देखील करण्यात येणार असून, याच अनुषंगाने हनुमंत गडावर जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी देखील होणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

You cannot copy content of this page