कोरोनाचे नियम पाळत शांततेत यात्रा साजरी करा

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी;कुणकेश्वर यात्रा नियोजनसाठी घेतली आढावा बैठक

देवगड ता.१८-: श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सव दि१ मार्च महाशिवरात्री या दिवशी होणार असून कोरोनाचा तिसरा टप्प्या सुरू असून कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी शासन,प्रशासन यांच्या कोरोना निर्बंधांचे पालन करून ,स्थानिक देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांनी साजरा करावा .त्या प्रमाणे स्थानिक भाविकांची गैरसोय न करता ती शांततेत पार पाडावी .

त्याचबरोबर सर्व विभागा नी आपली खात्याची जबाबदारी पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कुणकेश्वर येथे बोलताना केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर कुणकेश्वर यात्रा नियोजन पूर्व बैठकीत संबंधित विभागांच्या आढावा बैठकीत बोलताना स्थानिक भाविक व नागरिकांनी हा यात्रौत्सव कोरोनाचे निर्बंध पाळून साजरा करावा.असेही सांगितले.

दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा १ व २ मार्च रोजी संपन्न होणार असून शासन स्तरावर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी या वर्षी कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय योजना करून पार पाडण्यात यावा त्यानिमित्ताने खास विविध खात्यांची आढावा बैठक श्री क्षेत्र कुणकेश्वर सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पार पडली. या वेळी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, परिक्षाविधींन कालावधीतील उपजिल्हाधिकारी तथा देवगड गटविकास अधिकारी (आयएएस)संजीता महापात्र,तहसीलदार मारुती कांबळे,पोलीस निरीक्षक,नीलकंठ बगळे,जिल्हा विशेष शाखा सहा. पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे ,सुरेश राठोड, विजयदुर्ग पोलीस स्थानक प्रभारी पोलीस निरीक्षक भारत फारणे, सा. बा.उपविभागीय अधिकारी श्रीनिवास बासुतकर,सहा. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण श्री महाले,तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड, बीएसएनएल उपविभागीय अधिकारी कैलास पायमोडे ,श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सरपंच चंद्रकांत घाडी,ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,सचीव शरद वाळके,खजिनदार अभय पेडणेकर,सदस्य संजय आचरेकर,संतोष लाड,विजय वाळके,अजय नाणेरकर,प्रकाश वाळके,मंगेश पेडणेकर,अनिल धुरी,दीपक घाडी,रुपेंद्र धुवाळी, पदसिद्ध सदस्य श्रीकृष्ण बोडाळे उपस्थित होते. व्यवस्थापक रामदास तेजम, ग्रामसेवक पांडुरंग शेडगे,आदित्य कदम उपस्थित होते. या बैठकीत बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, कोरोनाचे निर्बंध पालन करून कोठेही शांततेचा भंग न होता कायदा सुव्यवस्था राखीत स्थानिक नागरिक व्यापारी यांनी हा यात्रौत्सव पार पाडावा यासाठी प्रशासनाचे सहकार्य निश्चित आहे .मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता,तसेच व्हीआयपी मार्ग,रस्त्यातील वाढलेली झाडी,तसेच बीएसएनएल रेंज,भरारी पथक,आपत्ती व्यवस्थापन,तसेच दर्शन रांगा, पाणीपुरवठा,पोलीस बंदोबस्त ,आरोग्य यंत्रणा,स्वछता ग्रामपंचायत नियोजन अन्य विविध खात्यांचा आढावा घेण्यात येऊन, अपुरी विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.त्याचबरोबर श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसर ,मंडप व्यवस्था,दर्शन रांगा, पाणी सुविधा व अन्य मार्गाची पाहणी केली .व आवश्यक त्या सूचना स्थानिक देवस्थान ट्रस्ट,व ग्रामस्थ,खातेप्रमुख याना दिल्या.

You cannot copy content of this page