उपनगराध्यक्ष मिताली सावंत पदसिद्ध महिला बालकल्याण सभापती
चारही सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक विराजमान झाले तर महिला व बालकल्याण उपसभापती पदी भाजपच्या स्वरा सुशील कावले यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीत बांधकाम सभापती पदी तेजस दत्तात्रय मामघाडी,स्वछता वैद्यक,आरोग्य समिती सभापती पदी,नितीन शरद बांदेकर,पाणीपुरवठा जलनीसारण सभापती पदी संतोष रवींद्र तारी, महिला बालकल्याण सभापती पदी विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत या पदसिद्ध सभापती म्हणून निवड बिनविरोध करण्यात आली.
तसेच स्थायी समिती सदस्य निवड करण्यात येऊन यातही शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. देवगड जामसंडे विषय समित्यांचे सभापती पदाची आणि महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदाची निवडणूकीचे विशेष सभेचे आयोजन पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अवेशकुमार सोनाने(रोहयो)सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते.ही विशेष सभा स.११.३० वा. नगरपंचायत सभागृहात सुरू झाली सभापती पदाकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने स्वतः मुख्यधिकारी यांचेकडे नामनिर्देशन पत्र दु.२ ते ४ या वेळात सादर केले यात, सा. बा. बांधकाम सभापती तेजस मामघाडी,सार्वजनिक आरोग्य सभापती पदी,नितीन शरद बांदेकर,पाणी पुरवठा जलनीसारण सभापती पदी संतोष रविंद्र तारी यांनी,महिला बाल कल्याण उपसभापती पदाकरिता भाजपच्या स्वरा सुशील कावले यांनी अर्ज दाखल केला .महिला बाल कल्याण सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचेकडे राहिले. या व्यतिरिक्त बांधकाम समिती सदस्यपदी,निवृत्ती उर्फ बुवा तारी, अरुणा पाटकर,आरोग्य समिती सदस्य पदी विशाल विकास मांजरेकर,तन्वी योगेश चांदोस्कर, पाणीपुरवठा समिती सदस्य पदी रोहन वि.खेडेकर,शरद रामचंद्र ठुकरुल,महिला बालकल्याण समिती सदस्य पदी मनीषा अनिल घाडी यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा,विषय समिती सभापती यांचे मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे,यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या बरोबरच स्थायी समिती समितीची घोषणा करण्यात येऊन सभापती साक्षी प्रभू,सदस्य पदी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, विषय समिती सभापती नितीन बांदेकर,तेजस मामघाडी संतोष तारी यांची निवड करण्यात आली. फोटो १)नवनिर्वाचित विषय समिती सभापती यांचे अभिनंदन करताना शिवसेना पदाधिकारी फोटो -नितीन बांदेकर,तेजस मामघाडी,संतोष तारी, मिताली सावंत,स्वरा कावले
