*⚡सावंतवाडी ता.१८-:* मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या संकल्पनेतून आणि शहर मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “शिव आरोग्य सप्ताह” शासनाच्या नियमाचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने “शिव आरोग्य सप्ताह” ओटवणे, विलवडे,आरोस, इन्सुली येथे होणार आहे. शिव आरोग्य सप्ताहची सुरुवात उद्या दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला ओटवणे येथे सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. या सप्ताह मध्ये संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्यूप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा आपल्याला कोणता आजार आहे हे कळत नाही किंव्हा आजाराची लक्षणे समजत नाही. अशावेळी आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार सुरू ठेवल्यास आजार बरा होतो. मात्र वेळीच तपासणी न केल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराचा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नसतो. परंतु वेळीच तपासणी करून दिसणाऱ्या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच उपचार करून या आजारावर कमी खर्चात मात करु शकतो. याच उद्देशाने मनसेने संपूर्ण शारीरिक तपासणी ऍक्यु प्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराचे ओटवणे, विलवडे, आरोस् येथे आयोजन केले आहे. या शिबिराचा सर्व दशक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावाकिंव्हा आजाराची लक्षणे समजत नाही. अशावेळी आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार सुरू ठेवल्यास आजार बरा होतो. मात्र वेळीच तपासणी न केल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराचा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नसतो. परंतु वेळीच तपासणी करून दिसणाऱ्या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच उपचार करून या आजारावर कमी खर्चात मात करु शकतो. याच उद्देशाने मनसेने संपूर्ण शारीरिक तपासणी ऍक्यु प्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराचे ओटवणे तसेच विलवडे आरोस इन्सुली येथे आयोजन केले आहे. या शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन मनसे शहर मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी कडून करण्यात आले आहे
