वेंगुर्ले शहरांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ

नवीन युवकांना पक्षात सामावून घेण्याचे उदिष्ट

वेंगुर्ले ता.१८-:* वेंगुर्ले शहरांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानांत येत्या 5 मार्च पूर्वी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार पटणाऱ्या व राष्ट्रवादीची ध्येय धोरणांचा सन्मान करणाऱ्या अशा शहरातील महिला व पुरुष नागरीकांची सभासद नोंदणी तसेच युवा वर्गाचा पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना बळकटीच्या दृष्टीने काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावे. असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी आयोजित सभेत केले.

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हॉस्पीटलनाका वेंगुर्ले येथील कार्यालयात शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणी अभियान अंतर्गत वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाचा कार्यक्रमाचा शुभारंभ नवीन युवक रॉईस्टर फर्नाडीस यांचा राष्ट्रवादी प्रवेश व त्यांचा सभासद नोंदणी फॉर्म भरून घेऊन करण्यात आला.

या सभेत प्रत्येक कार्यकर्त्यांना आपापल्या भागातील नागरीकांत राष्ट्रवादी पक्षाने केलेली विकास कामे व राष्ट्रवादीची ध्येयधोरणे, सर्वसामान्यांसाठी राष्ट्रवादीने केलेल्या कामांची माहिती देऊन सभासद नोंदणी जास्तीतजास्त लवकर करावी. याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन करण्यांत आले. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांत जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा बँक माजी संचालिका सौ. प्रज्ञा परब, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, स्वप्नील रावळ, सचिन शेटये, प्रदेश महिला सचिव सौ. नम्रता कुबल, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, शहर महिला अध्यक्ष सौ. सुप्रिया परब, अपूर्वा परब, अमित म्हापणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  

You cannot copy content of this page