सावंतवाडी ता.१८-:* प्रशालेची माजी विद्यार्थिनी तन्वी रविंद्र प्रभू हि सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर यांच्या हस्ते प्रशालेत सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. मधुकर घारपुरे, श्री किशोर सावंत, कुमारी समृद्धी सावंत, रवींद्र प्रभू, कुमारी तनया वाडकर, संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, खजिनदार श्री मुकुंद वझे, संचालक श्री रवींद्र स्वार, संचालिका सौ. राजश्री टिपणीस, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर उपस्थित होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीची माजी विद्यार्थिनी तन्वी रवींद्र प्रभू हिने सीए परीक्षेत उत्तुंग असे यश प्राप्त केल्याबद्दल संस्था कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार श्री प्रफुल्ल संगोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात तन्वी हीने विद्यार्थ्यांना संबोधताना आपल्या समोरील आव्हाने कितीही खडतर असली तरी सातत्यपूर्ण अथक परिश्रम घेतल्यानंतर यश प्राप्त होते असे मत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांचे समोर व्यक्त केले. तन्वीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेची आणखी एक माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या दिलीप कुलकर्णी ही देखील सीए परीक्षा उत्तीर्ण झाली याबद्दल तिचेही प्रशालेतर्फे व संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस यु बांदेलकर तर आभार श्री एस एस वैज यांनी मानले.
