मालवण: (प्रतिनिधी) साळकुंभा (गावडेवाडी), नांदरुख येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले आहेत. सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्री.सत्यनारायणाची पूजा, सायं.५.३० पासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद, साय.७ वाजता आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम, रात्री. ८.३० वाजता श्री गांगेश्वर प्रसादिक दिंडी मंडळ नारिंग्रे ता.देवगड यांचे वारकरी भजन, रात्री. १० वाजता श्री स्वामी कृपा महिला भजन मंडळ कातवड यांचे वारकरी भजन होणार आहे.
या शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमित गावडे मित्रमंडळ तसेच समस्त गावडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
