*मालवण ता.१७-:* भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली देण्यासाठी मालवण नगरपरिषद, नगर वाचन मंदिर, अ. भा. मराठी नाट्यपरिषद शाखा मालवण, स्वराध्या फाऊंडेशन, अष्टपैलू कलानिकेतन व कलांकूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मामा वरेरकर नाटयगृह या ठिकाणी स्वर – आनंदघन हा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या आणि संगीतबध्द केलेल्या गाण्यांचा सुरीला प्रवासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक नुकतीच नगर वाचन मंदिर येथे पार पडली. या बैठकीला सुनिल परूळेकर, संजय शिंदे, सुधीर गोसावी, प्रफुल्ल गोसावी, सुशांत पवार, रविना पांजरी, प्रतिक कोतिवडेकर आदी उपस्थित होते, अशी माहिती नगर वाचन मंदिरचे ग्रंथपाल संजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
