Headlines

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ रोजी मानसिक आरोग्य शिबिर

बांदा : प्रतिनिधी जिल्हा रुग्णालय ओरोस, रुग्णकल्याण समिती बांदा व प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील आरोग्य शिबिराला जिल्हास्तरावरून तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

तरी या शिबिराचा लाभ बांदा भागातील जास्तीत जास्त लोकांनी घेण्याचे आवाहन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने करण्यात आले आहे आहे.

You cannot copy content of this page