कॉलेजच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
कणकवली ता.१७-:* कणकवली कॉलेजच्या सन १९८१ च्या बीकॉमच्या बॅचचा द्वितीय स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी नव्याने आलेल्यांना सुद्धा खूप बरे वाटले आणि पुन्हा एकदा सर्व मित्र-मैत्रीणी एक वर्षांनी भेटल्यानंतर आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवीराज मित्र उदय दळवी याला “नक्षत्र जिल्हास्तरीय काव्यमैफिली २०२२” मध्ये मिळालेल्या सन्मानपत्राबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. स्नेह मेळाव्यात काही जणांनी आपले अनुभव व जीवनातील गोष्टी शेअर केल्या. पुन्हा एकदा कॉलेजच्या आठवणीना उजाळा मिळाला. कार्यक्रमात सर्वांनी भाग घेवून गाणी, विनोदी चुटके, कॉलेजच्या आठवणी सांगून कार्यक्रमात अधिक मजा आणली. विनायक घोणे यांनी तर आपले विनोदी किस्से व गाणी सादर करून सर्वांना हास्यरंगात घेवून गेले. सुजन कामत याने आपल्या पंढरीच्या पायी वारीतील अनुभव कथन केले. यावर्षी शरद परब, बी. एम. दळवी यानी आवर्जून उपस्थिती लावली.संध्याकाळी मित्रप्रसाद देसाई यांनी मिनी बस मधून आचरा चौपाटीवर घेऊन जावून आणखीनच आनंदात भर घातली.
यावेळी कणकवली कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक दिवाकर मुरकर ,कणकवलीतील मालू गारमेंटचे मालक प्रसाद देसाई तसेच नेवीमधून निवृत्त झालेले विनायक घोणे, बँकमधून निवृत्त झालेले मोहन हुले ,सिंधुदुर्ग बँकेमधून निवृत्त झालेले अधिकारी उदय दळवी, स्टेट बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त झालेले सुधीर साळगावकर, आर. जी. चिंदरकर, अँड. सतीश नाडकर्णी,अँड. बी. एम. दळवी, सुरेखा करंबेळकर, रजनी चिंचळकर, मीरा माईनकर, निर्मल कोरगावकर, संपदा पावसकर, मंदा गायकवाड, अजित मोदी, अनिल बांदिवडेकर, हरिश्चंद्र सावंत, सुजन कामत असे जवळपास पस्तीस हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीयुत मोहन हुले, सुजन कामत, प्रसाद देसाई ,विनायक घोणे यांनी पार पाडले, यावेळी ४२ वर्षांनी सर्वांची भेट झाली.
