सकल मराठा समाज कणकवली आयोजितशिवजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

उद्या रक्तदान शिबीर व मधुमेह तपासणी

कणकवली ता.१७-:* सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२२ चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे शनिवार 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

शिवजयंती उत्सव २०२२ निमित्त १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १८ ते ६० वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे. शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ सकाळी १० वा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, सकाळी ११ वा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा .गट क्र .१ (५ वी )४ ते ५ मिनिटे शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग .गट क्र . २ ( इ . ६ वी ते ८ वी ) ५ ते ६ मिनिटे ,मी किल्ला / दुर्ग बोलतोय ,गट क्र . ३ ( ९ वी ते १२ वी ) ६ ते ७ मिनिटे ,छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि गनिमी कावा . गट क्र.४( महाविद्यालयीन गट ) ६ ते ७ मिनिटे. शिवरायांचे व्यापारी आणि शेती धोरण. प्रथम रु १००० द्वितीय रु .७०० तृतीय रु .५०० पारितोषिक दिले जाणार आहे. सकाळी ११.३० ते १ जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा. प्रथम रु ५०० द्वितीय रु . ३०० तृतीय रु .२०० पारितोषिक देण्यात येणार आहे.गट – अ ( इयत्ता ५ वी ) विषय- सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज. गट – ब ( इयत्ता ६ वी ते ८ वी ) विषय- शिवाजी महाराजांचे सिंहासन आरूढ व्यक्तिचित्र किवा माझा आवडता किल्ला दुपारी 3 वा . हळदी कुंकू समारंभ,सायंकाळी ५ वा . सिंधुगर्जना ढोपथक यांचे ढोल वादन.

रात्रौ ९ वा. ॐ कार कलामंच सावंतवाडी निर्मित मराठमोळा नजराणा असा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२२ निमित्त १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १८ ते ६० वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे.तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page