मालवण तालुक्यातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चुनवरे गावठणवाडी येथील श्रीकृष्ण दिनेश परब (२९ वर्ष) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत तो दिसून आला आहे.

याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी गुरुवारी दिली. मालवण येथे स्कुबा डायव्हिंग व्यवसायांत काम करणारा श्रीकृष्ण हा बुधवारी सायंकाळी मालवण येथून घरी आला होता . रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण हा घराबाहेर पडला रात्रौ साडे अकरा वाजेपर्यंत श्रीकृष्ण हा घरी न आल्यामुळे शोधाशोध केली असता घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत तो दिसून आला. मसुरे पोलिसांना याबाबत माहिती भाऊ अभय दिनेश परब यांनी दिली. मसुरे पोलीस पी.बी. नाईक व विवेक फरांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणला. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर चुनवरे येथे अंतिम संस्कार करण्यात आले. श्रीकृष्ण परब हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मालवण पोलीस स्थानकाचे एपीआय एस. एस. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. श्रीकृष्ण याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस स्थानकाचे पी. बी नाईक व विवेक फरांदे करत आहेत.

You cannot copy content of this page