कणकवली 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगावच्यावतीने उपकेंद्र साकेडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रक्तदाब,मधुमेह,औषधी व रक्त तपासणी करण्यात आली .
रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे , डॉ वाघमारे यांनी केली,तसेच आरोग्य सेवक मुसळे , आरोग्य सेविका योगिता गोसावी, नम्रता मुसळे , पर्नवी तांबे , आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले ,सदर शिबिरास साकेडी सरपंच राणे यांनी भेट दिली, यात 46 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
