सावंतवाडी ता.१७-: ग्रामपंचायत नेमळे आणि होली क्रौॕस सिस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय नेमळे येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले या आरोग्यशिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबीरामध्ये ब्लड, शुगर,डोळे ,जनरल हेल्थ तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले .या कार्यक्रमाचे औचित्य् साधून नेमळे ग्रामपंचायतिच्या वतीने आरोग्य उपकेंद्र नेमळे साठी पंधराव्या वित्त आयोगातून ४५ हजार खर्च करुन औषधे,गरोदर मातांसाठी फिटल डाॕपलर मशीन,लॕपटाॕप इत्यादी साहीत्य देण्यात आले. यावेळी नेमळे सरपंच विनोद राऊळ यानी उपस्थीत ग्रामस्थाना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे जर गावामाध्ये कुणी कॕंन्सरसारख्या दुर्धर आजाराने पिडीत असेल तर निरुखेवाडीमध्ये असलेल्या ईशा प्रेमालय या कॕंन्सर सेंटर मध्ये मोफत उपचार करण्यात येतात याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सीस्टर्स आॕफ द सोसायटी आॕफ द क्राॕस च्या सीस्टर्स, डाॕक्टर्स डाॕ.मस्के, डाॕ.संजय चव्हाण, डाॕ.मोनिका डिसील्व्हा डाॕ. सिध्दराम नागुरे, सिस्टर डेलिसा, फार्मीन, कार्मीन, सरपंच विनोद राऊळ, ग्रामसेविका श्रद्धा तेंडोलकर, आरोग्य सेवक बी.टी.जाधव, आर.एस.खडपकर, एन .बी.मेस्री, आशा प्रियांका नेमळेकर, अपर्णा राऊळ, राजा गवस, प्रतीक्षा सावंत, ग्रा.सदस्या भाग्यश्री घोगळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
