सावंतवाडी ता.१६-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी) सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या संघटनेचे माजी मार्गदर्शक गुरुवर्य कै. दशरथ दत्ताराम गोडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याच्या कुटुंबाकडून व अखिल प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीच्या वतीने यावर्षी शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक केंद्रस्तरावर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही गटातील टॉप टेन मधील विद्यार्थ्यांना गोडकर कुटुंबाकडून रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
