सावंतवाडी ता.१६-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झिरन्गवाडी माठेवाडा येथील शाळा क्रमांक 7 या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, उद्योग-व्यापार विभाग कार्याध्यक्ष हिदय्तूलला खान , संतोष जोइल,महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब , रंजना निर्मल ,आसिफ ख्वाजा,जहिरा क्वाजा,मयुरेश मळीक, कौस्तुभ नाईक,सावंत मैडम,शाळेच्या मुख्याध्यापिका मृग्नयना सावंत,कुडतरकर सर, तसेच शिक्षक उपस्तीत होते.
