वैभववाडी रोटरी क्लबचा पद्ग्रहन सोहळा संपन्न

सनद सुद्धा बहाल

वैभववाडी ता.१६ संजय शेळके:* वैभववाडी रोटरी क्लबचा पदग्रहण व सनद प्रदान सोहळा मंगळवारी दिमाखात संपन्न झाला. वैभववाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी संतोष टक्के, सेक्रेटरीपदी संजय रावराणे, खजिनदारपदी प्रशांत गुळेकर यांची निवड जाहीर झाली आहे.

यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, सौ. धोंड, वर्षा बांदेकर, असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, राजेश घाटवळ, कणकवली रोटरीचे अध्यक्ष विद्याधर तायशेटे, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईनकर आदी उपस्थित होते. वैभववाडी रोटरी क्लब मधील रोटेरियन पुढील प्रमाणे – प्रेसिडेंट संतोष टक्के, चार्टर प्रेसिडेंट सेक्रेटरी संजय रावराणे, ट्रेझरर प्रशांत गुळेकर, तसेच मुकुंद रावराणे, मनोज सावंत, मंगेश कदम, विद्याधर सावंत, सचिन रावराणे, गणेश मसुरकर, शैलेंद्र परब, डॉ.दिपा पाटील, सलोनी टक्के, स्नेहल रावराणे, समिता कुडाळकर, पुजा सावंत, ॲड. विवेक गोखले, संजय सावंत, संदिप पाटील, गंगाधर केळकर, सुर्यकांत धावले, नामदेव गवळी, महेश संसारे, मंदार चोरगे, तेजस आंबेकर, विजय महाडिक, संदिप पाटील, प्रशांत कुळये, प्रशांत ढवण, मंगेश चव्हाण, सुनिल कुंभार, सुर्यकांत पाटील, अरविंद गाड, रोहन रावराणे, सुनिल रावराणे, शरद नारकर, शैलेश भोवड, बाबाजी पारकर, सचिन सावंत, सुरेंद्र नारकर आदी 32 रोटरीयनचा समावेश आहे. अध्यक्ष संतोष टक्के, नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष रोटरीयन संजय सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रिदम प्ले स्कुल च्या विद्यार्थ्यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page