*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. विमानाने चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचायत समिती कार्यालय, कुडाळकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. पंचायत समिती, कुडाळ येथे आगमन व राखीव.
सकाळी 10 वा. पंचायत समिती सभागृह, कुडाळ येथे श्री भराडी देवी यात्रा आंगणेवाडी संदर्भात आढावा बैठक. सकाळी 10.30 वा. पंचायत समिती सभागृह, कुडाळ येथे श्री देव कुणकेश्वर देवस्थान संदर्भात आढावा बैठक. सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह, कुडाळ येथून मोटारीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहाकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. बॅरिस्टर नाथ पै सभागृह, कुडाळ येथे दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वा. कुडाळ येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण. दुपारी 12 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
