संजय राऊत यांच्यावरील टीकेचा खा विनायक राऊत यांनी घेतला समाचार
मुंबई दि.१६-:* नारायण राणे यांना मुख्यमंत्री जरी केले असले तरी बाळा साहेब ठाकरे यांनी कधीच त्यांना शिवसेनेचा नेता म्हंटले नाही. अशी जोरदार टीका शिवसेनेने राणे कुटुंबीयांवर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद नंतर आज खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावर पुन्हा एकदा शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेत राणे कुटुंबावर टीका करण्यात आली आहे.
यावेळी ते असे म्हणले की, खासदार संजय राऊत हे सेनेचे नेते असून, भाजप आणि नारायण राणे यांनी जरी त्यांना इडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला असला तरी ते न डगमगता त्यानी पत्रकार परिषदेत घोटाळ्या विषयी खुलासे केले आहेत. यावेळी राणे कुटुंबीयांनी आता पर्यंत सगळ्याच पक्षाशी बेइमानी केली असल्याची जोरदार टीका केली आहे.
