कणकवली 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद उर्दु शाळा नांदगाव दुरुस्तीसाठी (रुपये १०लाख) मंजूर केले. या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत , खास. विनायक राऊत यांच्या माध्यमातून तसेच गौरीशंकर साहेब व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे.यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख निसार शेख, मुख्याध्यापक अब्दुल मुनगी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाबुद्दीन बोबडे, ग्रा. पं. सदस्य रज्जीद बटवाले, रमिजानबी बटवाले, राजा नावळेकर, इमाम नावळेकर, उमर नावळेकर, अहमद बटवाले, अब्दुल नावळेकर, शकील बटवाले, विठोबा महाडेश्वर, महंमद साटविलकर, बाबा आंबर्डेकर, फिरोज साटविलकर, निजाम साटविलकर व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
