आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथकातर्फे मोफत आरोग्य शिबीर

कणकवली 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित १४ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे आयोजित केले आहे.

तरी सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे, या शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील यासाठी संपर्क- 7350847345 साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page