हडी सरपंच महेश मांजरेकर यांचा गौरव

मालवण ता.१०-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँग्रिकल्चरच्या कौन्सिल मेंबर पदाचा पदग्रहण समारंभ मुंबई येथे सपन्न झाला. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या पदाधिऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले. यावेळी मालवण तालुक्यातील हडी गावचे सरपंच महेश मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला.

या समारंभाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते हडी गावचे सरपंच महेश मांजरेकर यांना गौरविण्यात आले. मांजरेकर हे सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशन फाऊंडेशन संचालीत डॉ. एस्. एस् कुडाळकर हायस्कुलचे संचालक आहेत. मांजरेकर हे विविध क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून विविध संस्था मध्ये सक्रिय आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण विकास प्रक्रियेत उपक्रमशील सरपंच म्हणून ते बहुचर्चित आहेत. मांजरेकर यांच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व भागवत कराड यांच्या कडून प्रशंसा करण्यात आली.

You cannot copy content of this page