वेदिका आचरेकर व्दितिय तर प्रिया गांवकर तृतीय;गणेश मंदीराचा वर्धापनदिन उत्साहात
कणकवली ता.१०-:* गणेश कृपा कला किडा मंडळ , कसवण गांवकरवाडीच्यावतीने श्री गणेश मंदीराचा पाचवा वर्धापनदिन व गणेशजयंती सोहळानिमित्त आयोजित होम मिनिस्टर ‘ श्री गणेश मानाची पैठणी या कार्यक्रमात सौ. रत्नमाला धाकू गांवकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत श्री गणेश मानाची पैठणीचा मान प्राप्त केला तर , व्दितिय क्रमांक श्री गणेश मानाची पैठणी सौ . वेदिका विकास आचरेकर , व तृतीय क्रमांक श्री गणेश मानाची पैठणी सौ . प्रिया प्रविण गांवकर ठरल्या. गणेश कृपा कला किडा मंडळ , कसवण गांवकरवाडीच्यावतीने दोन दिवस या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
सकाळच्या सत्रामध्ये धार्मिक विधी , दुपारी महाआरतीनंतर महाप्रसाद व दु .४ ते रात्रौ ११ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू होती . त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले होते .
महीलांसाठी हळदीकुंकू , मुलांसाठी जल्लोष युवाईचा हा व्हरायटी शो , हरिपाठ , भजने , किर्तने , दशावतारी नाटक असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते . त्यामध्ये लक्षवेधी कार्यक्रम महीलांसाठी ‘ होम मिनिस्टर ‘ श्री गणेश मानाची पैठणी या कार्यक्रमाने तर रंगत आणली . हा कार्यक्रम टॅलेक्स अॅकॅडमी , कणकवली यांच्या सौजन्याने आयोजित केला होता . यामध्ये उत्तेजनार्थ प्रथम ५ मधील सौ . संजना संदिप गांवकर व सौ ज्योती संदिप गांवकर व संगीत खुर्ची विजेती सौ . स्नेहा निलेश शिरवंडेकर यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . होममिनिस्टर कार्यक्रमामध्ये ५१ महिलांनी भाग घेतला होता . पैठणीचे विविध खेळ खेळत प्रथम ५ मधील या वहिनींचा सत्कार करण्यात आला . यावेळी या मंडळाचे अध्यक्ष विलास गांवकर , मनोहर मालंडकर , सरपंच- सौ . गीता तेली , संतोष गांवकर , अरविंद पालव , सत्यवान गुरव , भाडु गांवकर , भाई गांवकर , अभय गांवकर , व सर्व सन्मानीय सदस्य व सर्व महीला उपस्थित होत्या . टॅलॅक्स अॅकॅडमी कणकवलीचे प्रो . विरेन गायकवाड , सौ . सुष्मा गायकवाड यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला . होम मिनिस्टर कार्यक्रमांचे सूत्र संचालन विलास गोलतकर यांनी केले . श्री गणेश मंदिर ५ वा वर्धापन दिन व गणेश जयंती करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .
