कुडाळ ता.०९-:* मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सिंधुदुर्गातील स्नेहांश इंटरटेनमेंट निर्मित आणि शेखर गवस दिग्दर्शित माली आणि झुल्बी २ या दोन्ही शॉर्टफिल्म सरस ठरल्या आहेत.
मुंबई येथे संपन्न झालेल्या मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये स्नेहांश इंटरटेनमेंट निर्मित “माली” या शॉर्टफिल्मची सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्टफिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. माली या शॉर्टफिल्म मधील मुख्य भूमिका करणारी दिव्या धामणकर तिचा भाऊ मुन्नाची भूमिका करणारा कु. साहिल महेंद्र सातार्डेकर याला सलग दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सहाय्यक बालकलाकार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर “झुल्बी २” या शॉर्टफिल्म मधील “बायग्या” या व्यक्तिरेखेसाठी कु. दीक्षा नाईक हिला उत्कृष्ट बालअभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. स्नेहांश इंटरटेनमेंट आणि साहीलने मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हे यश संपादन करण्यासाठी दिग्दर्शक शेखर गवस, सह दिग्दर्शक सत्येंद्र जाधव, लेखक रामचंद्र कुबल, संकलन सिध्येश खटावकर, निर्माता सुभाष धामाणेकर, महेंद्र सातार्डेकर, कृष्णा धुरी, सहनिर्माता रवी कुडाळकर, छायांकन शेखर सातोस्कर, चेतन पवार, अजय कुडाळकर, कलाकार दिव्या धामणकर, शरद सावंत, साईल सातार्डेकर, अंकिता चिंदरकर, दिक्षा कोर, प्रमोद नाईक आणि आर्ट टीम ने खूप मेहनत घेतली आहे.
